Ad will apear here
Next
A Farewell to Gabo and Mercedes
“त्या दिवशी, एक मृत्यूमुखी पडलेला पक्षी घरात आढळला. घराची मागची बाजू जेवताना डायनिंग टेबलवरुन बगीचा पहाता यावा यासाठी काही वर्षांपूर्वी काचेच्या भिंतींनी बंद करुन घेतली होती. तो पक्षी उघड्या दरवाजातून आत आला असावा आणि बाहेर पडायचा मार्ग शोधताना काचेच्या भिंतीला धडकून सोफ्यावर मृतावस्थेत कोसळला असावा.
त्याच सोफ्यावर, त्याच ठिकाणी माझे वडील नेहमी बसायचे.
या प्रसंगानंतर “घरातल्या कर्मचार््यां चे दोन गट पडले” असं माझ्या वडिलांची सेक्रेटरी मला सांगत आली. एका गटातल्या लोकांना हा अशुभ संकेत वाटत होता. तो पक्षी कचर््याषत टाकून द्यावा असं त्यांचं मत होतं. दुसर््या गटाला तो शुभशकुन वाटत होता. त्यांना तो पक्षी फुलांच्या ताटव्यापाशी बागेत पुरावा असं वाटत होतं. पहिल्या गटानं तोपर्यंत पक्ष्याची कचरापेटीत रवानगी केली होती. वादंग झाल्यानंतर पक्ष्याला बागेतल्या एका कट्ट्यावर ठेवलं. त्याला आमचा पोपट आणि कुत्रा यांना पुरलं होतं तिथे अखेरीस पुरण्यात आलं. पाळलेल्या पशुपक्ष्यांच्या या कॉर्नरबद्दल वडिलांना सांगितलं नव्हतं. त्यानं ते कष्टी झाले असते.”
“त्या गुरुवारी माझ्या वडिलांच्या मृत्यूची बातमी सार्वजनिकरीत्या जाहीर केल्यानंतर त्यांच्या सेक्रेटरीला एक इमेल आलं. इमेल पाठवणारी मैत्रीण माझ्या वडिलांशी अनेक दिवसात बोलली नव्हती.
त्या इमेलमध्ये, “उर्सुला” ही “वन हंड्रेड इअर्स आॉफ सॉलिट्यू़ड” या कादंबरीतली गाजलेली व्यक्तिरेखा. ती एका गुरुवारी मरण पावते. उर्सुलाच्या मृत्यूनंतर पक्षी असेच सैरावैरा उडून भिंतींवर आदळून जमिनीवर कोसळतात आणि मरण पावतात” असं कादंबरीत वर्णन आहे. ते आम्हाला आठवतंय का?” असं त्या मैत्रिणीनं विचारलं होतं.
माझे वडिल मरण पावले त्या दिवशी सकाळी घरात मरुन पडलेला पक्षी हा एक योगायोग आहे असं ते इमेल मला वाचून दाखवणार््या् सेक्रेटरीला नक्कीच वाटत होतं. मी याबद्दल काहीतरी बोलेन अशा अपेक्षेनं ती माझ्याकडे पहात होती.”
गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ या जगप्रसिध्द लेखकाचा मुलगा रॉडरिगो यानं लिहिलेल्या A Farewell to Gabo and Mercedes या पुस्तकातलं हे वर्णन.
२०१२ साली डिमेंशिया-स्मृतीभ्रंश झाल्यानंतर दोन वर्षांनी गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ मरण पावला. त्यानंतर ६ वर्षांनी रॉडरिगोची आई मर्सिडिज २०२० साली मरण पावली. आपल्या आईवडिलांच्या शेवटच्या काळातल्या आठवणींवर हे पुस्तक आधारित आहे.
स्वत:चीच पुस्तकं वाचून एकदा गाबोनं Where on earth did all this come from?” असं रॉडरिगोला विचारलं होतं.. अशा या पुस्तकातल्या आठवणी डोळ्यात पाणी आणतात. “त्यांच्या ८७ वर्षांच्या आयुष्याची सुरुवात, मध्य आणि शेवट माझ्यासमोर एखाद्या अॅकॉर्डियन बुक सारखं तरळत होतं..” अशी वाक्यं रॉडरिगोही उत्तम लेखक असल्याची साक्ष पटवतात..!
It looks like one of the most fortunate and privileged lives ever lived by a Latin American.. असं रॉडरिगो आपल्या वडिलांच्या आयुष्याबद्दल एका पानावर लिहितो. एक वाचक म्हणून मार्क्वेझचं लिखाण वाचण्याबाबत आपणही most fortunate and privileged आहोत याची तेव्हा प्रकर्षानं जाणीव होते.
नीलांबरी
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZUODH
Similar Posts
अ थाउजंड ब्रेन्स - भाग ३ जेफ हॉकिन्स यांच्या ‘अ थाउजंड ब्रेन्स’ या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा तिसरा भाग....
अक्षर एके काळी लोकप्रिय असलेल्या देवनागरी म्हणजेच लेखणी वळणाच्या ठराविक पध्दतीच्या ह्या साध्यासुध्या, घरंदाज, अक्षरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगाची ठेवण, अक्षरांचे अवयव ! एका अवयवाचं दुसर््या अवयवाशी असलेलं नातं. नात्यातलं अंतर. त्यांचे अदृश्य बंध
अ थाउजंड ब्रेन्स - भाग २ जेफ हॉकिन्स यांच्या ‘अ थाउजंड ब्रेन्स’ या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग.
अ थाउजंड ब्रेन्स - भाग १ जेफ हॉकिन्स यांच्या ‘अ थाउजंड ब्रेन्स’ या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा पहिला भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language